Friday, 2 November 2012

माझं ध्येय

This is a creation of another "Anonymous Friend" of mine. He talks about one's aim and destiny in life. I have attempted to translate it so that everybody can enjoy the article. I am aware that translation is no match to the original work.


एखादी व्यक्ति एखाद्या विशिष्ट कामासाठी देवाने जन्माला घातलेली असते.
व्यवहारातील अपरिहार्यता म्हणून किंवा अनेकदा आपल्याला उपजीवीकेसाठी किंवा इतर काही कारणाने आपण ज्या कामासाठी जन्मलेलो आहोत किंवा जे काम आपल्या हृदयात वसलेले आहे त्या कामाव्यतिरिक्त अन्य काही नोकरी किंवा व्यवसाय करावा लागतो. पण तरिही निसर्गाने ज्यासाठी आपल्याला बनवलेले आहे, त्या कामची साद आयुष्यभर आपला पिच्छा सोडत नाही. आपण त्या निसर्गाच्या  सादेला किती ही दुर्लक्षित केले तरिही कित्येकदा एखाद्या हळव्या क्षणी हृदयात खोल कुठेतरी ती उर्मी उसळत  राहते. खूप वेळा हृदयाच्या त्या हाकेला कित्येक दिवस, महीने, वर्ष आपण 'ओ' दिला नाही तर त्या हाकेचा आवाज क्षीण होत जातो. मग उरते ते फक्त कंठण्याचं आयुष्य. मग जगणं थांबतं आणि उरतं ते आयुष्याच्या वाटेवर रखरखित उन्हातील अनवाणी  चालणं...त्यात मग हृदयाची सतार होत नाही, श्वासांचे कधी पंख होत नाहीत अन् धमन्यांमध्ये पाखरं उडत असल्याचा साक्षात्कार होत नाही. केवळ काही वर्षांच्या आपल्या या आयुष्यात असा रखरखित उन्हाळा टाळायचा असेल तर कधी एखाद्या नाजूक क्षणी खडबडून जागी व्हावं लागते. हृदयावरच्या खपल्या उचकटून त्याच्या खालची लसलसणारी जखम बघावी लागते. जगाने वेडे म्हटले तरी सुसाटपणे आपल्या स्वप्नांच्या मागे धावावं लागते. स्वप्न साध्य होईल की नाही हा विचार गौंण असतो. स्वप्नांच्या हाकेला 'ओ' दिला, हृदयाच्या ओढीला रस्ता दिला अन् मनाच्या अनिवार उर्मीला वाट दिली तर हेच या सार्‍या उठाठेवीचे फलित असते. त्यात खरच एक वेगळा आनंद, समाधान आणि शांतता असते...



Translation:
I believe God has created each and every person for some special purpose or aim in life, which can be called as one’s destiny. But due to compromises and many times for the sake of earning, one has to choose a path different from the one destined. But that’s how life goes on. Yet, we can hear the echo of our destined purpose inside the heart. This echo haunts us in our journey. If you neglect it, it keeps on striking the shores of your heart like a tide. And if we don’t respond it, gradually it fades away. And then life becomes a cumbersome journey, lived for the sake of living. Life is reduced to mere breathing, as if one is walking and walking barefooted in scorching heat. The strings of heart become blunt and loose melody. Breaths lose their wings. Pulse loses its vigour. To avoid such misery in our short life, we have to wake up and shed all our inhibitions at some delicate juncture in life. We have to open our wounds by uncovering the scars. No matter the world calls you crazy, you have to chase your dreams, your destiny. It is immaterial to think if the dream will be achieved or not. Once you respond that echo, once you make way for your passion and fire, you will start living your life fully and truly. This pleasure of living is no small achievement. After all it has a genuine feel of happiness, satisfaction and peace.

3 comments:

  1. khupacch sundar...especially हृदयावरच्या खपल्या उचकटून त्याच्या खालची लसलसणारी जखम बघावी लागते. it was much real and appealing line..
    keep it up bro!!!

    ReplyDelete
  2. very inspiring...keep inspiring...
    Thanks

    ReplyDelete
  3. excellent !!!!!!

    ReplyDelete